आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दीड वर्षांनी जामीन मंजूर, पण...

मनीलॉण्ड्रिंग प्रकरणात गेली दीड वर्ष तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. वैद्यकीय कारणांसाठी मलिक यांना दोन महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. 

रामराजे शिंदे | Updated: Aug 11, 2023, 04:14 PM IST
आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दीड वर्षांनी जामीन मंजूर, पण... title=

Nawab Malik Bail : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( NCP Minister Nawab Malik ) यांना सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) जामीन मंजूर करण्यात आलं आहे. तब्बल दीड वर्षांनी ते तुरुंगाबाहेर येणार आहेत. पण वैद्यकीय कारणास्तव (Medical Reasons) 2 महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे. मनी लॉन्डिंगप्रकरणी (Money laundering) नवाब मलिक यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे मलिकांनी तब्येतीच्या कारणामुळे जामीन मागितला असल्यानं ईडीने त्याला विरोध केलेला नाही. याआधी हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिला होता. पण सुप्रीम कोर्टात त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

नबाव मलिक आजारी
नवाब मलिक यांच्या वकिलांनी कोर्टात दिल्लेया माहितीनुसार नवाव मलिक यांना किडनीचा विकार (Kidney disorder) आहे. नवाब मलिक यांची एक किडनी निकामी झाली आहे, त्यांची प्रकृती ढासळली असल्याचं वकिलांनी म्हटल होतं. मलिक यांची सध्या एकच किडनी कार्यरत आहे. मलिकांवर सध्या कुर्ला इथल्या क्रिटी केअर रूग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. मात्र किडनी ट्रान्सप्लांटसाठी त्यांना अन्य मोठ्या रूग्णालयात दाखल करायचं असल्याने त्यांच्या जामीनाची मागणी करण्यात आली होती. 

नवाब मलिक कोणत्या गटात
नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर बाहेर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले एक शरद पवारांचा आणि दुसरा अजित पवारांचा. त्यामुळे तुरुंगाबाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणत्य गटात सहभागी होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. गँगस्टर दाऊदबरोबही त्यांचे संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अजित पवार नवाब मलिक यांना आपल्या गटात घेणार का हा प्रश्न आहे. अजित पवार गटात आले तर भाजप आणि शिंदे गटाची भूमिका काय असणार याकडेही लक्ष असणार आहे. 

नवाब मलिकांना अटक का झाली?
नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी (Money Laundering Case) अटक करण्यात आली होती. मुंबईती कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) यांच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. 23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना ताब्यात घेण्यात आलं. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने  (ED) धाडसत्र राबवले होतं.